रमेश सिप्पी यांचा फिल्मफेअरच्या जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित .

Foto

मुंबई : शोले, शान, सीता और गीता आणि सागर सारख्या अनेक बहारदार चित्रपटांचे दिग्दर्शक रमेश सिप्पी यांचा काल  जीवनगौरव पुरस्कारने सन्मानित करण्यात आले आहे. चित्रपट क्षेत्रातील त्यांच्या अमुल्य योगदानासाठी त्यांना सान्मानित करण्यात आले. फिल्मफेअरने रमेश सिप्पी यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित केले. अभिनेता अक्षय कुमारच्या यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

80 च्या दहशकामध्ये रमेश सिप्पी यांच्या चित्रपटांचा बोलबाला होता. त्यांनी दिग्दर्शित केलेली चित्रपट सुपरहिट ठरली होती. त्यांच्या अनेक चित्रपटांनी इतिहास रचला आहे. शोले, शान, अंदाज, शक्ती त्यांची हिट चित्रपट आहे. तसेच तेव्हापासून आतापर्यंतही त्यांचे दिग्दर्शनाचे काम सुरूच आहे

2014 मध्ये त्यांनी दिग्दर्शित केलेले सोनाली केबल, 2013 मध्ये नौटंकी साला हे चित्रपट आले होते. या महान दिग्दर्शकाचा फिल्मफेअरकडून जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला आहे. केंद्र सरकारकडून 2013 मध्ये त्यांचा पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला आहे

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker